बिब्लिओग्राफी डेटाबेस

जनादेश

भाषांतराशी निगडीत सर्व उपक्रमांचे समाशोधन गृह
भाषा संशोधन केंद्र, वडोदराचे प्रो. गणेश देवी यांना त्यांच्या डाटाबेसच्या डाटा व इनपूटच्या आखणीबद्दल विशेष आभार.

बिब्लिओग्राफी कशाकरीता

बिब्लिओग्राफी म्हणजे पुस्तकांचा पद्धतशीर अभ्यास व वर्णन होय.

बिब्लिओग्राफीचा उद्देश हा एखाद्या विषयावर माहिती एकत्रित करणे अशा प्रकारे बिब्लिओग्राफी आपल्याला पुस्तकाचा इतिहास सांगते.

भाषांतर डाटाबेसच्या बिब्लिओग्राफीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  SOURCES:
  » अनुकृती (सीआयआयएल- साहित्य अकादमी व एनबीटी)
  » भाषा संशोधन केंद्र, वडोदरा
  » ब्रिटीश लायब्ररीचे ओरियंटल व इंडिया ऑफीस कलेक्शन्ज
  » विविध प्रकाशकांची सूची
  » सेंट्रल रेफरंस लायब्ररी, कोलकाता
  » नॅशनल बिब्लिओग्राफी ऑफ इंडियन लिट्रेचर
  » साउथ एशियन युनियन कॅटलॉग, (युनिर्सिटी ऑफ शिकागो लायब्ररीचे सदर्न एशिया डिपार्टमेंट)
  » युनेस्को
  » युनिर्व्हसिटी ऑफ इल्लिनॉयस, अरबाना-

बिब्लिओग्राफीच्या स्टाईल्स पद्धती त-हा शैली

बिब्लिओग्राफीच्या स्टाईलबद्दल विविध सोर्सेसचे विविध फॉर्मट आहेत.

एमएलए(MLA- मॉडर्न लग्विज असोसिएशन) आणि एपीए(APA-अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन) ह्या दोन मार्गदर्शिकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.

एनटीएमने विकसित केलेल्या बिब्लिओग्राफीची खास वैशिष्टये

ही एनटीएमने विकसित केलेली बिब्लिओग्राफी भाषांतरीत शिर्षकांवर जोर देते जे की साहित्यीक व असाहित्यिक प्रकारात मोडतात. इतकेच नाही तर भारतातील सगळ्या भाषेत प्रकाशित भाषांतरीत शीर्षकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्या जातो ते घटनेच्या ८ व्या परिशिष्ठात नमूद केलेले असोत वा नसोत.

भारतीय भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतील भाषांतर शीर्षकांचा समावेश करणे हा ही कार्यसूचीचा एक भाग आहे.

भारतीय भाषेत भाषांतरीत झालेल्या पुस्तकांसाठी एनटीएम एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर देते जो आयएसटीएन म्हणून ओळखल्या जाईल. आयएसटीएन निर्माण करण्यामागचे कारण म्हणजे भारतीय भाषेत प्रकाशित भाषांतरीत शीर्षकांचा मागोवा घेणे होय. हे संशोधक, पंडित तसेच ज्ञानाची लालसा असलेल्या लोकांना कामी येईल. एखाद्या भाषेत व एखाद्या विषयातील प्रकाशित पुस्तकांची संख्या व ते कुठल्या सालचे आहे इ. ची त्यांना कल्पना येईल.


एनटीएमने ह्या डेटाबेसची उपलब्धता वाढविण्यासाठी हा डेटाबेसवेब साईटवर आधारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनटीएमच्या डेटाबेसमधे नसलेली माहिती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती माहिती पुरवून एनटीएमला मदत करू शकता. तुम्ही तुमच्या नावावर उपयोगकर्ता खाते उघडून तुम्हाला माहिती असलेल्या भाषांतराचे रेकॉर्ड तयार करू शकता. तुम्ही माहिती ntmciil@gmail.com वर पाठवू शकता जी की एनटीएमच्या डेटाबेसमधे अपडेट केल्या जाईल. जर तुम्ही प्रकाशक असाल तर उपयोगकर्त्याच्या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमच्या अलिकडील भाषांतराबद्दल सरळ डाटाबेसमधे माहिती अपडेट करू शकता. तुम्ही माहिती ntmciil@gmail.com वर पाठवू शकता जी एनटीएमच्या डाटाबेसमध्ये अपडेट होईल.

बिब्लिओग्राफी शोध

भारतीय भाषेतील कुठल्याही शीर्षकाच्या माहितीसाठी इथे शोधा