निवेदन

2-आठवड्याचा इंटेन्सिव्ह (पूर्ण वेळ ) प्रशिक्षण कार्यक्रम

Application form (अर्ज डाउनलोड करा आणि भरा)
 
भाषांतरकाराचा कौशल्य-विकास हे NTMच्या अनेक कार्यक्षेत्रामधील केंद्रस्थानी आहे. मिशन भाषांतरकारांना इंटेन्सिव्ह कार्यक्रम आणि अभिमुखता (Orientation) कार्यक्रमाच्या रूपात प्रशिक्षण देते. हे तज्ञ भाषांतरकारांना शैक्षणिक पाठिंबा सुद्धा देते. भाषांतरामधे प्रमाणपत्र व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

2-आठवड्याचा इंटेन्सिव्ह (पूर्ण वेळ) प्रशिक्षण कार्यक्रम

कोण भाग घेऊ शकतात? हा कार्यक्रम जे भाषांतर एक छंद म्हणून जोपासतात किंवा भाषांतरामधे करीयर करू इच्छितात अशांसाठी आहे. हे व्यावसायिक भाषांतरकार आणि ‘भाषांतर अभ्यासक्रम’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना त्यांच्या ज्ञानात अभिवृद्धि करायची आहे आणि त्यांत निपुणता प्राप्त करायची आहे. सहभाग्यांमध्ये सामान्यत: (अ) कर्मचारी ज्यांनी आत्ताच करीयरला प्रारंभ केला आहे आणि विविध विद्यापीठे / संस्थांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी, (ब) वेगवेगळ्या सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये काम करणारे भाषा-अधिकारी, (क) CSTT कामकाजात अंतर्भूत व्यक्ती इ.

कुठे? प्रशिक्षण आणि अभिमुखता (ओरिएन्टेशन) कार्यक्रम राष्ट्रीय भाषांतर मिशन, भारतीय भाषेतील केंद्रीय भाषा संस्था, मैसूर येथे आयोजित होतात. तेव्हा आणि इतर ठिकाणीही कार्यक्रम आयोजित केले जातात, जेव्हा व जिथे यजमान संस्थांचा सहयोग असतो.

 
शुल्क:तसे पाहता अभ्यासक्रमाचे शुल्क असे नाही. पण सहभाग्यांना रु 500/ कार्यक्रमाच्या प्रारंभी अमानत म्हणून ठेवावे लागतील. ही रक्कम Translation Today या नियतकालिकांच्या एक-वर्षांच्या वर्गणीत जुळवून घेतले जाईल.

अर्ज कसा करावा? ज्यांची इच्छा असेल त्यांनी अर्ज भरून आणि सही करून पाठवावा (इथे डाउनलोड करा www.ciil.org / www.ntm.org.in ANNOUNCEMENTखाली), सोबत लागू प्रमाणपत्रे आणि शिफारसपत्रे (टेस्टिमोनियल्स) जोडून या पत्त्यावर पाठवा
  The Project Director,
National Translation Mission,
Central Institute of Indian Languages,
Manasagangotri, Hunsur Road,
Mysore, Karnataka 570006.

प्रशिक्षक कोण आहेत? NTM मध्ये या क्षेत्रातील अनेक जाणकार आहेत. काही प्रशिक्षक संस्थेत (इन-हाऊस) NTM, CIIL मध्ये कार्यरत आहेत, तर काही जण विविध संस्थांमधून नियुक्त केलेले आहेत. टीप: वर्षभर कधीही अर्ज स्वीकारले जातात. अर्जाच्या पाकीटावर ठळक अक्षरात डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वरती 'Application for for NTM Translation Training programme’ असे लिहिलेले असावे. जे नोकरी करतात किंवा काही नियमित कार्यात आहेत त्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या नोकरी देणाऱ्यामार्फत किंवा संस्थेच्या प्रमुखाद्वारेपाठवणे जरुरीचे आनिवडलेल्या उमेदवारांची नावे CIIL आणि NTM च्या वेबसाईटवर नमूद केली जातील.

संपर्कस्थान कृपया सर्व प्रश्न इथे पाठवा: ntmtrainingprog2016[at]gmail[dot]com