घडामोडी

भारतीय अनुवाद अभियान कार्यशाळा, चर्चासत्र तसेच दिशाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करून भाषांतराच्या डिसकोर्सला चालना देते अस्तित्वात असलेल्या भारतीय भाषेतील साहित्येतर ग्रंथांच्या भाषांतराचे मूल्यमापन करते. नवशिक्यांना भाषांतराचे प्रशिक्षण देते माहितीचा प्रसार करते. विद्याभासी (स्कॉलर), भाषांतरकार, तज्ञ आणि प्रकाशकांना NTM च्या कार्यक्रमात चर्चा व संवादासाठी सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते.
 

कार्यशाळा

एनटीएम कार्यशाळांचे आयोजन संपादन सहाय्यक गटाच्या कार्याचे निष्पादन करण्यासाठी करते; २२ भाषेतील प्रत्येक विषयासाठी त्या एका खास ग्रंथासाठी शब्दावली तयार करण्यासाठी. पुस्तकाचे भाषांतर झाल्यावर प्रत्येक भाषेच्या संपादन सहाय्यक गटातील तज्ञ किंवा संपादन सहाय्यक गटाने सुचवलेले तज्ञ एका कार्यशाळेत भेटून हस्तलिखिताच्या परीक्षणात मदत करताता किंवा भाषांतरकाराला मार्गदर्शन करतात.
 

चर्चासत्र

राष्ट्रीय अनुवाद अभियान भाषांतराशी निगडीत अकादमीक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करते. ह्या चर्चासत्रातील विद्योचित पेपर्सचे परीक्षण केल्या जाऊन ते जतन केल्या जातात. हे चर्चासत्र NTM ला अकादमिक वादचर्चेचे आगार निर्माण करण्याच्या कामी येतात. ज्याचा उपयोग भाषांतर अभ्यास व तत्सदृश विषयात रूची असणारे लोक करू शकतील (खास करून विद्यार्थी आणि संशोधक.)
 

दिशाभिमुख/ उन्मुखीकरण कार्यक्रम

राष्ट्रीय अनुवाद अभियान विविध प्रकारच्या दिशाभिमुख/ उन्मुखीकरण कार्यक्रमांचे आयोजन करून सहभागकांना भाषांतर, भाषांतराचे सिद्धांत तसेच साहित्येतर ग्रंथांच्या भाषांतराशी निगडीत विविध बाबींवर दिशा दिल्या जाते. भाषांतरकारांना भाषांतराशी विविध साहित्याची ओळख करून देऊन त्यांची तयारी करून घेतल्या जाते. सहभागक हे विविध कॉलेज व विद्यापिठातील विद्यार्थी व संशोधक असतात. कॉलेज आणि शिक्षक, शिलेदार भाषांतरकार तसेच विविध व्यवसायातील लोक सुद्धा या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. सहभागक हे नॅशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स मधूनही निवडल्या जाऊ शकतात.

जे साधन पुरूष ह्या कार्यक्रमात बोलावल्या जातात ते भाषांतर अभ्यास व तत्सदृश (त्याच्याशी निगडीत) विषयाचे किंवा भारतीय भाषेतील लेखक जे नियमीत भारतीय भाषेत साहित्येतर ग्रंथांची निर्मिती करतात असे असतात. असे तज्ञ जे की साहित्येतर ग्रंथांच्या भाषांतरात व विविध भारतीय भाषेच्या पारिभाषिक संज्ञा निर्मितीच्या कामात गुंतलेले आहेत ते एनटीएम्(NTM) चे साधन पुरूष म्हणून भाग घेऊ शकतात.
 

इतर कार्यक्रम

NTM त्यांच्या कामाला बढावा देण्यासाठी देशभरातील पुस्तकांच्या मेळाव्यात सहभागी होते. भाषांतरीत पुस्तकांच्या प्रकाशनानंतर लागलीच NTM त्यासाठी प्रमोशनल कार्यक्रम घेते ज्यामधे लेखक व भाषांतरकारांशी बैठक इ.चा समावेश होतो.