शब्दकोश

उच्च दर्जाच्या भाषांतर साहित्याची नर्मिती जसे की शब्दकोश आणि थिसॉराय निर्मिती हा मुख्य उद्देश होय. २२ भारतीय भाषांमधे द्वैभाषिक शब्दकोश व ई-शब्दकोश बनवल्या जात आहेत. हे बोलीभाषा प्रयोग, दर्भासहित नैसर्गिक वाक्यरचना, मुबलक प्रमाणात उदाहरणे, तसेच नेहमी वापरात येणारे लेक्सिकल व फंकश्नल आयटम्स आणि त्यांचा वापर.

NTM विविध भारतीय भाषांत शब्दकोश बनविण्याचे काम करत आहे. सध्या दोन प्रकारचे कोश बांधणीचे कार्य NTM ने हाती घेतले आहे.
   अ)    द्वैभाषिक मूलभूत शब्दकोश
   ब)    द्वैभाषिक इ-शब्दकोश

द्वैभाषिक मूलभूत शब्दकोश

केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूरने युनाईटेड किंगडम स्थित लॉंगमन पिअर्सन ग्रुपशी मे-जून २००६ मध्ये संगनमत करून द्वैभाषिक शब्दकोश बनवण्याचे काम सुरू केले आहे. हे शब्दकोश भाषांतराचे साधन म्हणून कामी येतात. एनटीएम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प एनटीएममध्ये समाविष्ट करण्यात आला. ह्या द्वैभाषिक शब्दकोशांची रचना ही ब्रिटीश नशनल कॉर्पसच्या अत्यंत प्रसिद्ध अशा १४,००० अधिक वापरातील शब्द व पदबंध असलेल्या बेसिक इंग्लिश-इंग्लिश शब्दकोशावर आधारित केली आहे.

लॉंगमन-एन्टीएम-सीआयआयएल मूलभूत द्वैभाषिक शब्दकोश हे टप्प्याटप्प्याने आणले जाणार आहेत. बंगाली, हिंदी, कन्नडा, मल्याळम, ओडिया व तामिळ हे सहा शब्दकोश आधीच प्रकाशित झाले आहेत (खाली त्यांची यादी दिल्या गेली आहे); लवकरच पंजाबी, तेलुगू व उर्दू शब्दकोशही येणार आहेत.
 
२०११-२०१२ मधे पिअर्सन एज्युकेशनने प्रकाशित केलेल्या शब्दकोशांची यादी–

  १. लॉंगमन सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी हिंदी शब्दकोश
  २. लॉंगमन सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी बंगाली शब्दकोश
  ३. लॉंगमन सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी कन्नडा शब्दकोश
  ४. लॉंगमन एनटीएम सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी ओडिया शब्दकोश
  ५. लॉंगमन एनटीएम सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी मळ्याळम शब्दकोश
  ६. लॉंगमन एनटीएम सीआयआयएल इंग्रजी इंग्रजी तामिळ शब्दकोश

NTM सध्या कोश उभारणी कार्यक्रमाच्या विस्तारात तसेच ८ व्या परिशिष्ठात नोंदवलेल्या २२ भारतीय भाषांत शब्दकोश आणण्याच्या प्रयत्नात आहे.

द्वैभाषिक ई- शब्दकोश:

एनटीएम-सीआयआयएल ने दोर्लिंग किंडर्सले (इंडिया) प्र. लि. यांच्याशी मार्गदर्शन सेवेसाठी तसेच पिअर्सन एज्युकेशनच्या लॉंगमन अडवान्सड द्वैभाषिक फ्रेमवर्क चा एक्सेमेलचा डेटासेटच्या वापरासाठी तह केला आहे. A-Z अक्षरांचा एलएबीएफ डेटाबेस लॉंगमन युके ने एनटीएमसाठी आयडीएम(IDM) सर्वरवर टाकला आहे अपलोड केला आहे. हा एलएबीएफ डेटासेट जो की मुळात लॉंगमननी विकसित केला आहे व ज्याला आयडीएम फ्रांसने बाजारात आणले आहे तो शब्दकोश निर्मिती प्रणाली(DPS) मार्फत वापरल्या जाईल. एन्टीएम् (NTM) द्वैभाषिक इलेक्ट्रॉनिक शब्दकोश

  » लॉंगमन डिक्शनरी ऑफ कन्टेम्पररी इंग्लिश
  » लॉंगमन अडवान्सड अमेरिकन डिक्शनरी
  » लॉंगमन डिक्शनरी ऑफ इंग्लिश अड कल्चर
  » लॉंगमन बिजनेस डिक्शनरी
  » लॉंगमन डिक्शनरी ऑफ इंग्लिश
  » लॅग्वेज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लॉंगमन कॉर्पस नेटवर्क

एन्टीएम्(NTM) पिअर्सन एज्युकेशी विविध महत्त्वाच्या पैलूंच्या संदर्भांना अंतिम रूप देण्यासाठी/ठरविण्यासाठी संपर्कात आहे.