|
भाषांतराचे काम
देशातील प्रकाशकांसमवेत समन्वय करून NTM भारतीय भाषांत भाषांतर प्रकाशीत करते. हे एकतर
निवडलेल्या पुस्तकांचे मालकीहक्क असलेले प्रकाशक असतात किंवा असे लोक जे की भारतातील
वेगवेगळ्या प्रांतात पुस्तके प्रकाशीत करतात. एनटीएम भाषांतरीत पुस्तकाच्या मार्केटींग
व वितरणासाठी अशा प्रकाशकांसोबत काम करते.
भाषांतर आणण्यासाठी अभियानाने वापरलेले दोन मोघम मार्ग म्हणजे:
|
»
|
मूळ प्रकाशक स्वत: प्रकल्प घेतात व भाषांतर आणतात. एनटीएम अंशत: या प्रकल्पात खर्चाचा
काही भार सांभाळून किंवा अकादमीक तज्ञांचा पुरवठा करून सहभाग घेतो.
|
|
»
|
जर मूळ प्रकाशकाला पुस्तकाच्या भाषांतरात रूची नसेल तर एनटीएम ते भाषांतर, त्याचे प्रकाशन
व वितरण भारतीय भाषेतील प्रकाशकाकडून आउटसोर्स करून घेते व भाषांतराची मालकी स्वत:कडे
राखते. मूळ ग्रंथाचे मालकीहक्क असणाऱ्याला मानधन मिळते. जर भारतीय भाषेतील प्रकाशक
भाषांतर करून घेऊ शकत नसेल तर एनटीएम ते भाषांतर करवून घेते व कॅमेरा रेडी कॉपी तयार
करते. एनटीएम कॅमेरा रेडी कॉपी भारतीय भाषेतील प्रकाशकाला देते. प्रकाशक त्या भाषांतरीत
ग्रंथाच्या छपाई व वितरणाची जिम्मेदारी स्विकारतो.
|
दुसऱ्या प्रकाराला टर्नकी मोड ऑफ ट्रांसलेशन असाईनमेंट म्हणतात.
|
|
|