डाटाबेस

NTM ने सहा प्रकारच्या माहितीचा संचय किंवा डाटाबेसची निर्मिती केलेली आहे. जसे की, नशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स, फकल्टी डाटाबेस एक्सपर्टस रिपॉजिटरी, प्रकाशकांचा डाटाबेस, भाषांतराच्या बिब्लिओग्राफीचा डाटाबेस तसेच शब्दकोश व शब्दसंग्रहाचा डाटाबेस. हे डाटाबेस फक्त NTM च्या कामी पडत नसून ते विद्वान, प्रकाशक, विद्यार्थी तसेच भाषांतरकाराच्या सुद्धा कामी येतात. हे डाटाबेस भारतीय भाषेतील भाषांतरकारांबद्दल माहिती पुरवतात. महत्त्वाची विद्यापीठे आणि त्यांचे कोर्स मटेरियल, फॅकल्टी तसेच विविध विषयतज्ज्ञांची माहिती, विविध भारतीय भाषांतील भाषांतरीत पुस्तके, शब्दकोश, शब्दसंग्रह व थिसॉराय (शब्दकुलकोश). हा डाटाबेस विद्यार्थी, संशोधक तसेच विविध विषयातील फॅकल्टीस उपयुक्त ठरेल.