FAQসমূহ

1. मी एनटीएमशी कसा जोडल्या जाऊ शकतो? मला एनटीएममध्ये भाषांतरकार म्हणून नावनोंदणी करावयाची आहे. ती मी कशी करू? मी अंडरग्रज्युएट विद्यार्थी म्हणून एनटीएममध्ये कशी नोंदणी करू?
उत्तर:तुम्ही तुमचा डिटेल्ड रेझ्युमे येथे http://www.ntm.org.in/languages/english/login.aspx. दाखल करा. तुमच्याशी आम्ही लवकरच संपर्क साधू.

2. मला एनटीएम सोबत एखाद्या पुस्तकाचे भाषांतर करून ते प्रकाशित करायचे असेल तर ते मी कसे करावे?
उत्तर:तुम्ही तुमच्या प्रकल्पाचा तपशीलवार प्रस्ताव कामाच्या नमुन्यासह पाठवा. आमची टीम त्याचे मूल्यमापन करून तज्ज्ञांची प्रतिक्रिया तुम्हाला कळवेल.

3. एनटीएमशी जोडून संलग्नित राहण्यासाठीच्या पुर्वअटी काय आहेत?
उत्तर: एनटीएमच्या भावी भाषांतरकाराकरीता वय, पात्रता, ठिकाण याची आवश्यक्ता नाही.

4. माझ्यावर जागेचे निर्बंध आहेत तरीही काय मी एनटीएमशी जोडून राहू शकतो?
उत्तर: एनटीएमची रचना ही भाषांतराचा उद्योग बनविण्यासाठी व भाषांतराची पॅशन असणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केली गेलेली आहे त्यामुळे जागेच्या निर्बंधाला स्थान नाही. तुम्ही जगातील कुठल्याही भागातून आमच्यासोबत काम करू शकता.

5. मल्टीमिडिया भाषांतर म्हणजे काय?
उत्तर: लिखित व बोली दस्तावेज मोठ्या प्रमाणावर भाषांतरित व अर्थान्तरीत केल्या जातो. या दोन शीर्षकाखाली न येणाऱ्या सर्व गोष्टी मल्टीमिडिया भाषांतरात केल्या जातात. उदाहरणार्थ, कथन(नरेशन व वॉईस ओवर सेवा, सबटायटलिंग, संक्रमणस्थळाचे भाषांतर, व मल्टिमिडिया डेस्कटॉप पब्लिशिंग ह्या गोष्टी मल्टिमिडिया भाषांतरात येतात.

6. वॉईस ओवर व नरेशन तुमच्या भाषांतर प्रकल्पाचा हिस्सा होऊ शकतात काय?
उत्तर: सीआयआयएलने वॉईस ओवर व नरेशनशी संबंधीत प्रकल्प घेतले आहेत व माहितीपटांची निर्मिती केली आहे.

7. तुम्ही कुठल्या भाषांतराच्या साधनाचा वापर करणार आहात काय ?
उत्तर: एनटीअमचे उद्दिष्ट हे उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणे जसे की शब्दकोश, वर्डनेट इ. होय. ज्यांना ह्या साधनांचा उपयोग होणार आहे अशांकरीतादेखील हे उपलब्ध केल्या जाऊ शकतील.

8. मी भाषांतर करताना कुठल्या फॉर्मेटचा वापर करावा ?
उत्तर:

9. मला भाषांतराचा अंदाजा कसा येईल ?
उत्तर:

10. निवडक भाषांतरकारांसाठी काही कोर्सेस असतील काय़?
उत्तर: एनटीएमच्या भाषांतरकारांच्या दिशाभिमुख कार्यक्रमाचे एक प्राथमिक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे विशेष प्रशिक्षण होय. एनटीएम संभाव्य भाषांतरकारांसाठी अल्पावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून भाषांतरकारांसाठी कोर्स मोड्युल्स व पॅकेजेस बनविते, त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी उत्तेजन देते...प्रोत्साहित करून आधार देऊन भाषांतर टेक्नॉलॉजीच्या विशेष कोर्सेसच्या विकासात मदत करते.

11. मी माझ्या आवडीच्या पुस्तकाचे भाषांतर करू शकतो काय वा एनटीएम मला निवड व ग्रंथ दोन्हीही देईल?
उत्तर: एनटीएमचा साहित्येतर ग्रंथांचा डेटाबेस हा भाषांतर साहित्यासाठी मूळ सोर्स स्त्रोत असेल.