भाषांतरकारांचे प्रमाणपत्रीकरण व प्रशिक्षण

तपशीलवार व्यापक प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे NTM च्या धोरणांपैकी एक धोरण म्हणजे देशात भाषांतराचा उद्योग स्थापन करणे होय. NTM चा असा विश्वास आहे की यामळे भाषांतरकाराला दृश्यरूपता मिळेल/ दृष्टिगोचर होतील.

NTM नशनल रजिस्टार ऑफ ट्रांसलेटर्स ठेवतो आहे ज्यामध्ये ५००० च्यावर भाषांतरकारांची नावनोंदणी झाली आहे. NTM ने भाषांतरकारासाठी देशात ठिकठिकाणी बऱ्याच दिशाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये विविध भाषा व विषयातील तज्ञांकडून त्यांना अभिप्राय मिळालेला आहे.

NTM सध्या प्रशिक्षण प्रमाणपत्रीकरणात गुंतलेल्या लोकांशी व मध्यस्थ संस्थां जसे की स्कूल ऑफ ट्रांसलेशन स्टडीज अड ट्रेनिंग, इग्नो, क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया इ.शी सल्लामसलत करत आहे NTM ने प्रमाणपत्रीकरणाच्या संदर्भात काही मंथनीय सत्रांमध्ये विविध मध्यस्थ संस्था व इतर बऱ्याच संस्थांमधील तज्ञांच्या टीमला सामिल केले आहे. प्रमाणपत्रीकरणाच्या कशा प्रकारे केल्या जाईल याची घोषणा लवकरच संकेतस्थळावर केल्या जाईल.

NTM भाषांतरकारांचे प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही भाषांतरकारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतात व बाहेर आधीच अस्तित्वात असलेले अभ्यासक्रम व पाठ्यक्रम साहित्य गोळा करतो आहोत. NTM प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आखणीसाठी तज्ञ व विविध संघटनेसोबत काम करत आहे. एक देशव्यापक प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच राबवल्या जाईल.