| 
         
         
         
         
                
    
                
                
                
                
                
                
                    
                    
                     
                    
             
              | 
             
        
               
                
                 
         
         
         
         
            
    
        बिब्लिओग्राफीचा इतिहास
         
         
                    
                         
    
        
            
                
                    भाषांतर डेटाबेसच्या बिब्लोग्राफीची गरज ही खूप पुर्वीच जाणवलेली आहे. Anukriti.net
                    भाषांतराच्या माहितीची व सेवेची साईट केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, साहित्य अकादमी
                    व नशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया या भारतातील तीन आद्य संस्थांनी- मिळून २००२ मध्ये विकसित
                    केली आहे. जवळपास २०००० शीर्षकांची माहिती गोळा केल्या गेली व शोधता येईल असा/घेण्याजोगा
                    डेटा अनुकृतीने विकसित केला. तथापि, डेटा ऑथेंटिकेट करण्याची व फिल्ट्रेट करण्याची
                    गरज आहे.
                     
                     
                    जून २००८ मध्ये NTM ची सुरूवात झाली आणि अनुकृतीला त्यामध्ये विलीन करण्यात आले. भाषांतराच्या
                    डेटाबेसची बिब्लिओग्राफी बनवण्याचे काम एनटीएमने सुरू केले. २०११ मध्ये प्रकल्पाचे
                    नूतनीकरण करून प्रकल्प नव्याने सुरू केला गेला. एक रोडमॅप बनवला गेला व विविध माध्यमातून
                    डेटा गोळा केल्या गेला. बरीच भारतीय विद्यापिठे, ग्रंथालये, भाषांतर एजन्सीज, लिटररी
                    सोसायटीज व संस्थांशी संपर्क निर्माण केल्या गेला. आम्ही जवळजवळ ७०,००० शीर्षकांची
                    माहिती गोळा केली आहे. य़ा शीर्षकांची चाळण प्रक्रिया व डिजिटाईजेशन होणे आवश्यक आहे.
                    वडोदऱ्याच्या भाषा संशोधन केंद्राचे प्रो. गणेश देवी यांनी सन २०११ च्या काळात त्यांच्याजवळ
                    संग्रहित असलेल्या २०,००० भाषांतरीत पुस्तकांच्या शीर्षकांना एनटीएमला देऊ केले आहे
                     
                     
                    सप्टेंबर २०११ मध्ये, भाषांतराच्या संदर्भसूची बिब्लिओग्राफीच्या डाटाबेसच्या शीर्षकांचे
                    कार्यशाळेदरम्यान प्रो. देवी यांनी प्रत्येक भाषांतरीत शीर्षकासाठी एक युनिक आयडी तयार
                    करण्याची कल्पना सुचवली व त्यासाठी एक पद्धतही सुचवली. नव्हेंबर २०११ मध्ये वडोदरा
                    येथे एका दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन केल्या गेले. मूळ ग्रंथ व भाषांतराबद्दल अधिक माहिती
                    पुरविण्यासाठी सध्या संकेतस्थळावर २५ भाषेतील २०,००० शीर्षक आहेत.
                     
                     
                 | 
             
         
        
            
                
                    
                         
                 | 
             
         
     
                
                
            
                     
                        
                    
                    
                    
                    
                     | 
                     
                     
                    
                 
                
                |