संदर्भ

प्रधानमंत्रींचे वक्तव्य
राष्ट्रीय अनुवाद अभियानाचा (NTM) विचार मुळात भारताच्या प्रधानमंत्रींकडून, आला, ज्यांनी राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या (NKC) पहिल्या सभेत अनुवादित साहित्यापर्यंतची पोच किती महत्वपूर्ण आहे ते सांगीतले, “अनुवादित साहित्यापर्यंतची पोच म्हणजे, बऱ्याचशा कठीण क्षेत्रातील ज्ञानापर्यंतची वाढती पोच.” शिक्षणातील लोकांचा सहभागाला प्रोत्साहन देणे, त्याचा विस्तार करणे आणि अविरत शिकणे हा त्याचा संदर्भ. शिक्षणक्षेत्रासाठी अनुवादाला प्रोत्साहन देण्याकरिती भारतात स्वतंत्र संस्था अथवा मोहीम उभारली जाणे अत्यावश्यक आहे असे श्री सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाला जाणवले.

संदर्भ
हे खरे आहे की अनुवाद ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, या खास क्षेत्रात सार्वजनिक हस्तक्षेपाची आवश्यक्ता मुळात देशातील अनुवादाच्या क्षेत्रातील असमानतेमुळे उद्भवली - अर्थात ही विषमता विषयाबरोबरच भाषा, गुणवत्ता, वितरण व पोच इ. च्या संदर्भात आहे. शुद्धशास्त्र, उपयोजीतशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, वैद्यकीयशास्त्र, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात अनुवादासाठी वाढती मागणी आहे याची पुरेशी जाणीव अध्याप कोणाला नाही.

याशिवाय अनुवादातून उपलब्ध झालेली माहिती अपुरी व अव्यवस्थित आहे. त्याचप्रमाणे वाचकवर्ग हा विखुरलेला असल्याने व त्यांच्यामध्ये संयोजन नसल्याने तसेच अनुवादाची बाजारातील पोच ही व त्याचे मुल्य ठरवून ते सुरक्षित करणे हे कधीच झाले नसल्याने अनुवादाचा प्रसार पुरेसा समाधनकारक नाही. दर्जेदार अनुवादाचा योग्य प्रसार झाल्यास या क्षेत्रात सुरू असलेल्या खाजगी कृतींना प्रोत्साहन व गती मिळेल. योजना पद्धतीने खाजगी पुढाकाराला वाव देऊन वेगवेगळ्या ज्ञानशाखात दर्जेदार अनुवाद उपलब्ध करण्याच्या संदर्भात अभियानाच्या स्वरूपात सार्वजनिक हस्तक्षेप हवा आहे. अनुवादाचे कार्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात रोजगार निर्माण करु शकेल. जेणेकरून सुशिक्षित बेकारांना रोजगार शोधण्यास व जनसेवा करण्यास प्रोत्साहन मिळेल.

या जागृतीने प्रो. जयंती घोषांच्या पुढाराखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना करण्यासाठी प्रेरणा दिली, जी अनुवादाचे कार्य, प्रकाशन व प्रसारणाशी संलग्न लोकांना आणि विविध एजंसीना एकत्र आणेल. कार्यकारी वर्गसमुहाशी संबंधित सरकारी आणि अर्धसरकारी संस्थेचे प्रतिनिधी, अकादमीचे प्रतिनिधी, भाषाविज्ञानातील तज्ञ, अनुवादक, शिक्षणतज्ञ, प्रकाशक आणि भारतातील अनुवादाच्या कार्याशी जोडलेल्या अन्य गटांचाही समावेश असेल. फेब्रुवारी २००६ मध्ये दिल्लीत या समितीची सुरुवात केली आणि त्यात प्रो. उदय नारायण सिंह यांनी या क्षेत्राची रूपरेषा तयार केली. ६ मार्च २००६ एनटीएम समितीचे सदस्य-संयोजक प्रो. जयंती घोषांनी राष्ट्रीय ज्ञान आयोगाची शिफारिश आणि आयोगाचा दुरूस्ती प्रस्ताव पुढे नेतानाच उपाध्यक्ष आणि योजना आयोगास लिहिले. त्यानंतर या मंडळाने अनेक बैठका घेतल्या. १२-१३ एप्रिल २००७ मध्ये भारतीय भाषांचे केंद्रीय संस्थान मैसूरमध्ये दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले. १९ एप्रिल २००६ या दिवशी पी.११०६०/४/२००५-ईडीएन या पत्रातून योजना आयोगाने दुरूस्ती प्रस्तावावर आपले मत प्रगट केले. यात मांडल्या गेलेल्या पाच पश्नांना, ज्यांना प्रतिसाद द्यायचा होता. दरम्यान CSDS व अन्य संस्था जसे ICHR मधील समाजशास्त्राच्या तज्ञांकडून मतप्रगटन केले गेले. यातूनच काही मुद्दे निर्माण झाले, त्यांच्या सर्जनशिल सुचनातून एनटीएमचा विस्तार व संघटना निर्माण करण्याचा विचार पुढे आला. यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश एनटीएमच्या संपूर्ण अहवालात केला गेला आहे. २१ जून आणि ३ जुलै २००६ या दिवशी अनुवाद क्षेत्राशी संलग्न अनेक प्रकाशनगृहांच्या सूचना आल्या. नंतर ३१ ऑगष्ट २००६ ला भाषा आणि पुस्तकांच्या प्रोत्साहनासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या कार्यकारी समितिने या प्रस्तावाला दुजोरा देऊन ११व्या योजनेसाठी योजना आयोगाकडे शिफारस केली. त्यानंतर १ सप्टेंबर २००६ राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष श्री सॅम पित्रोदानी एनटीएमचा मसुदा प्रस्तुत करताना प्रधानमंत्र्यांना लिहिले, तद्‌नंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाने विस्तृत प्रस्ताव निर्माण केला.