समस्यांचे संबोधन करणे

पुनरावृत्ती व नक्कल यापासून वाचण्यासाठी विविध संघटना जसे वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावली आयोग (CSTT), राष्ट्रीय शैक्षिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट,(NBT), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), साहित्य अकादमी, केंद्रिय भारतीय भाषा संस्थान, मैसूर (CIIL), ग्रंथ अकादमी, लोक वाचनालय नेटवर्क इ. चा समन्वय व सहभाग आवश्यक आहे. प्रकाशक, समाचारपत्र/माध्यमे, औद्योगिक संस्था, पुस्तक विक्रेताशी सम्पर्क करण्याची आवश्यकता असेल. तत्कालीन सामाजीक संस्था व खाजगी एजंट इ. कडे कार्यपद्बती व निर्णय करणे व एकापेक्षा अधिक संघटनेचा सहभाग वाढवण्याच्या कार्याला लागणे आवश्यक आहे.

एनटीएम द्वारे सम्बोधित केलेल्या मुख्य मुद्दांची खोलवर चर्चा करण्यासाठी इथे सूची केली आहे:

A. वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषा निर्माण करणे.

भारतातील प्रचलित बहुभाषिक परिस्थतिंमुळे भाषांमध्ये क्रमिक श्रृंखला निर्माण न करता एक भाषेतून दूसऱ्या भाषेत सहजपणे अनुवाद करण्यास वाव आहे. या सरळपणाला अधिक सुविधाजनक बनवण्यासाठी योग्य उपाय व वाटा शोधून कढणे गरजेचे आहे.
ज्ञानावर आधारित मूळ पाठांच्या अनुवादासाठी परिभाषांचे स्तरीकरण आणि संकल्पनांच्या निर्मितीबरोबरच अश्लिल भाषा अस्तरीकृत शब्दांचा प्रयोग वर्ज करण् खुपच महत्वपूर्ण ठरते, जेणेकरुन भाषांमधील भाषांतर सहज बनेल. एनटीएमद्वारे संबोधित केल्या जाणाऱ्या मुद्यांपैकी हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे.

B. अनुवादकांचे शिक्षण

अनुवाद ही एक विशिष्ट कला आसल्याने जेव्हा वेगवेगळ्या विषयातील पाठ अनुवाद करण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्यासाठी खास शिक्षणाची आवश्यक्ता भासू शकते. अभियान अनुवादकांच्या शिक्षणात खलीलप्रमाणे पुढाकार घेऊ शकतो:
1. संबंधित क्षेत्रातील विद्वान/तज्ञांना समावेश करून काही मुख्य उद्देश्यों जसे दुभाषिकरण, उपशीर्षक लेख, कायदा, शुद्ध विज्ञान, उपयोजीत विज्ञान, समाज विज्ञान इत्यादीच्या अनुवादासाठी अल्पकालीन शिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.
2. अनुवादकांसाठी पाठाचे (नमुने) मॉड्यूल आणि पॅकेज तयार करणे ज्याचा अंर्तभाव भाषा शिक्षणाच्या कार्यामध्ये केला जाऊ शकतो अथवा फुरसतीच्या, दैनंदिन कार्यानंतर पाठ्यक्रमाच्या रूपात चालवला जाऊ शकतो;
3. विद्यापिठीय व इतर संस्थेतील अनुवाद तंत्रज्ञानाच्या व संबंधीत क्षेत्राच्या अभ्यासक्रच्या विकासाला प्रोत्साहन, पाठबळ व सहकार्य देणे.
4. संशोधन प्रकल्पांना, तसेच विद्यार्थी संशोधनालाही प्रोत्साहन देणे, जे मूळात उदारहणाच्या रूपात अनुमान्य पाठाचे चांगले अनुवाद उपलब्ध करण्याच्या उद्देश्याने तयार केला गेला आहेत. तसेच अध्यापनशासत्रात वापरल्या जाणाऱ्या साधनांची निर्मिती करणे.
5. भारतीय भाषांमधील अनुवादवर विशेष भर देतानाच शिष्यवृत्ती कार्यक्रम निश्चत करणे जे संस्थांमध्ये विद्वानांच्या आदान-प्रदानाला परवानगी देईल.
6. वैशिष्ट्यपूर्ण संहिता उदाहरणादाखल घेऊन कार्यशाळांचे आयोजत करणे. जिथे प्रशिक्षणार्थी आणि तज्ञ एकत्रीतपणे येऊन मूळ पाठासंबंधित ज्ञानात्मक मजकूर, परिभाषा, सांस्कृतिक आणि भाषिक संदर्भ इ. मुख्य मुद्द्यावर परिचर्चा करतील आणि समाधान शोधतील.
7. अनुवादाचे मूल्यमापन, संपादन आणि प्रत संपादन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणे

C. माहितीचा प्रसार

देशातीत उपलब्ध अनुवाद क्षमतेची पुरेशी ज्ञान अध्याप कुणाला नाही. तसेच यासंदर्भात माहिती देणारा एकही स्रोत नाही. हे मुख्यत्वे भाषेच्या अनुवादकांच्या संदर्भात खरे आहे. पण इंग्रजी अनुवादक समस्त भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात.

अभियान अनुवादित पाठांपर्यतची पोच उपलब्ध दक्षता के बारे में पता करने के कठिनाई को निम्नलिखित रूप से संबोधिक कर सकता है:
1. विविध विषयात व क्षेत्रात विभिन्न कौशल्य आणि योग्यता असलेल्या अनुवादकांच्या माहितीचा एक संग्रह तयार करणे.
2. सर्व भारतीय भाषांमध्ये विभिन्न साहित्यकृत्तीच्या अनुवादाची तसेच आणि भारतीय साहित्यकृतीचे इंग्रजीत व इतर विदेशी भाषांमध्ये झालेल्या अनुवादाची ऑनलाईन ग्रंथसूची तयार करणे. यात वेगवेगळे विषय, भाषा व क्षेत्रासंबंधी शोध, वापर तसेच मतमोजणी इ. सुविधा असाव्यात.
या दोन्हीचे विश्वविद्यालय, प्रकाशक, राष्ट्रीय ग्रंथालये, अकादमी राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट (NBT) आणि वैज्ञानिक व तात्रिकी परिभाषा आयोग (CSTT) इ. च्या संपर्काद्वारे अद्ययावत करणे आवश्यक आहे.

साहित्य अकादमीने तयार केलेली भाषांतरीत साहित्याची सूची एका जागी संग्रहित केली आहे जी सुरवातीपासुनच सीआइआइएलच्या ‘अनुकृति’ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे साहित्य अकादमी अनुवादकांची सूची प्रकाशित करते ज्यात भारतीय भाषेतील अनेक अनुवादकांचा समावेश केला आहे. जी एनटीएमच्या संकस्थळावरही घातले जाऊ शकते. हल्लीच मान्यताप्राप्त भारतीय भाषांचा समावेश करण्यासाठी या दोन्हीचे अद्ययतन करण्याबरोबरच विस्तार करणेही आवश्यक ठरते. ही सूची साहित्यापर्यंत मर्यादीत असल्याने, इतर क्षेत्रातील अनुवादक व अनुवादाची सूची विस्तारित करण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी एनटीएम भारतातील विविध भागातील संग्रहक व संपादकांचा समावेश करू शकतो.

D. दृश्यता व विस्तार

अनुवाद आणि अनुवादकांनी अधिकाधिक दृश्यमान होणे आवश्यक आहे. याचा संबंध अनुवादकांच्या मानधनाच्या वाढिशीही असल्याने त्यावर पुन्हा एकदा नजर फिरवणे आवश्यक ठरते. ज्याअर्थी आपण अनुवादास उद्योगाच्या रूपात पाहतो जेणेकरुन पुढे भारतात ‘अनुवाद उद्योग’ स्थापित होईल, मग अनुवादकाचे कोणतेही विशिष्ट क्षेत्र असो, आपण अशी परिस्थिती उत्पन्न करणे आवश्यक आहे ज्याद्वरे अनुवादक केवळ अनुवादाच्या सहारे सुखवस्तु जीवन व्यतीत करू शकेल.

विविध क्षेत्रातल्या अनुवादकांची एनटीएममध्ये नोंदणी करून घेण्यासाठी तांत्रीक विकासाला अस्तित्वात आणणे गरजेचे आहे जेणेकरून गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच योग्यतेची ओळख पटेल. संबंधित विषयातले के तज्ञ, स्रोत आणि लक्ष भाशेतील विद्वान आणि सुज्ञ वाचक या मूल्यांकन समितीची निर्मिती करतील. जी अनुवादाचा दर्जा ठरवणे आणि राष्ट्रीय अनुवाद महासंघात या अनुवादाकांची नोंदणी केली जाऊ शकते वा नाही हे ठरवेल. ह्या अनुवादकांना ओळखपत्र व प्रमाणीकरणाची सुविधेने पुरस्कृत केले जाऊ शकते आणि त्यांची नावे एनटीएमच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाऊ शकतात.

E. अनुवादच्या प्रचार-प्रसारापर्यंतची पोच निश्चित करणे

Some other means to promote and make visible translations are:
1. अनुवादासाठी बाजारात पुस्तके आणण्यासाठी कार्याचे आयोजन करणे
2. अनुवादाला पुरस्कार व शिष्यवृत्ती देणे
3. वाचन, वादविवाद, पुस्तक प्रदर्शन, व या क्षेत्रतील अनुवादकांना सन्मान, इ. बरोबरच अनुवादावर क्षेत्रीय ‘अनुवाद मेळ्याचे’ आयोजन करणे.
4. दर्जेदार अनुवादासाठी आरंभीच्या बाजारपेठेची खात्री करण्यासाठी वाचनालय नेटवर्कशी संबंध जोडणे
5. प्रकाशक, लेखक आणि अनुवादकांकडुन अर्ज आल्यास एनटीएम सहायता व अनुदान विभाग योजने अन्तर्गत खरीदारीची-खरेदीची तजवीज करणे.
6. अनुवादाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एनटीएम सहायता व अनुदान विभागाकडून अनुवादकांना आणि प्रकाशनगृहांना आर्थिक सहाय्य देणे.
7. अनूवादित अध्यापन-सामग्री डाउनलोड करण्याची सुविधा, प्रधान्याने मुक्त स्रोत साइटकडून अथवा डाउनलोडप्रमाणे ठरल्यानुसार प्रकाशकास नाममात्र शुल्क भरून घेता येईल,
8. अनुवादक, अनुवादावर विशिष्ट पाठ्यक्रम पुरवणारे विध्यापिठातील विभाग, भाषांतरे प्रकाशित करण्यास उत्सुक असलेले प्रकाशक, सार्वजनीक व खाजगी क्षेत्रे व ग्राहक या सर्वांमध्ये परस्पर संबंध स्थापीत करणे.
9. अनुवादावर लक्ष केंद्रीत करून इंग्रजी व भारतीय भाषांमधील नियतकालिके प्रकाशित करण्यास अनुदान देणे. अथवा अनुवादात ई-लेख आणण्यात गुंतलेली नियतकालिके, प्रमुख व्यवसायिक नियतकालिकालीकांच्या प्रकाशनात, वा छपायीत किव्वा विविध विषयातील इंग्रजीमधून क्रमश: प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याच्या प्रादेशिक भाषेतील भाषांतरात गुंतलेल्यांना अनुदान विभागातून आर्थिक सहाय्य देणे.
10. भाषांतरीत साहित्य राष्ट्रीय/क्षेत्रीय शैक्षणिक आराखड्यात – आणि विद्यालय, महाविद्यालय व विश्वविद्यालयीन पाठ्यक्रमत समाविष्ठ करण्यासाठी सुचवणे व विनंती करणे.
11. भाषा संसाधन केंद्र आणि समस्त स्तरवरील शिक्षण संस्थात अनूदित पुस्तकांची खरेदी-विक्री करणारी पुस्तक केंद्रे स्थापित करण्यासाठी मदत करणे
12. भाषेचा वापर आणि उपयोजनाबरोबरच परीक्षा व नौकरी परीक्षण इ. निर्देशित करून द्विभाषी व बहुभाषी क्षमतेचे महत्त्व प्रक्षेपीत करणे उजागर; आणि
13. खासकरून भारतातील छोट्या शहरी आणि ग्रामीण भागात अनुवादित साहित्याची अधिकाधिक पोच सुनिश्चत करण्यासाठी सार्वजनिक आणि शहरी समाजिक संघटनेशी संपर्क स्थापित करणे.