प्रकल्पाचे डावपेच

संपुर्ण अभियानाचे महत्त्वाच्या कार्यात व घटनांमध्ये विभाजन केले जाऊ शकते. ज्याला इथे डावपेच म्हणुन संबोधता येईल.:
  » संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्टा केलेल्या सर्व भाषांमध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक संज्ञा निर्माण करण्यासाठी सिएसटीटीला सल्ला व सहकार्य देणे.
हे ध्येय प्राप्त करण्यासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग पाऊल उचलेल. हिन्दी आणि आधुनिक भारतीय भाषेत वैज्ञानिक और तांत्रिकी संज्ञा निर्माण व निश्चित करणे, CSTT अदेशाधीन आहे. आणि या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. परिणामस्वरूप CSTT एनटीएमच्या अनुवादच्या सहाय्यासाठी साधने उपलब्ध करेल. दूसऱ्या बाजूने राष्ट्रीय अनुवाद मिशन (एनटीएम) आठव्या परिशिष्टातील २२ भाषात संज्ञा निर्माण करण्यासाठी CSTT ला प्रोत्साहन आणि ज्ञान आधारित पाठांचा जलद अनुवाद करणे शक्य होईल. त्या संज्ञा सर्व २२ भारतीय भाषात उपलब्ध करणे व त्यात साधने तयार करण्यासाठी एनटीएम को सी-डेक आणि सीआइआइएल बरोबर काम करणे आवश्यक आहे.
  » इलेकट्रॉनिक शब्दकोश/शद्बसंग्रह स्वत: तयार करणे अथवा अन्यत्र करवून घेणे.
  » महाविद्यालयात आणि विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या सर्व मुख्य विषयातील ज्ञान आधारित पाठांच्या अनुवादाचे प्रकाशन ज्यात ६५ ते ७० ज्ञानशाखांमधील (प्रथम ४२ ज्ञानशाखांवर लक्ष केंद्रीत करून) जवळजवळ १७६० ज्ञानात्मक पाठ समाविष्ट केले जातील. व ११व्या योजनेपर्यंत २०० पाठ्यपुस्तकांचा समावेश होईल. (आत्तापर्यंत एनसीइआरटीने बारवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा अनुवाद केवळ दोन हिन्दी आणि उर्दू या दोन भाषेत केला आहे). एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यावर नंतरच्या योजनेत एकूण अनुवाद व प्रकाशने यात वाढ होंईल आणि दर योजने दरम्यान हा आकडा 8,800 पर्यंत जाईल असा कयास आहे.
  » भारतीय भाषांमधील अनुवादावरील नियतकालिके, अनुवादव व अनुवादाशी संबंधित मूळ पाठांच्या मुद्रण आणि विश्लेशणसीठी आर्थिक सहाय्य देणे
  » लेखक/अनुवादकांना आइपीआर/मालकी हक्कासाठी अनुदान
  » विविध स्तरावर अनुवाद प्रशिक्षण व ओळखपत्र देम्यासाठी अनुदान
  » प्राकृतिक भाषाप्रक्रिया अथवा अनुवादाशी संबंधित NLP संशोधनासाठी अनुदान
  » अनुवादावर पदवी/डिप्लोमा पाठ्यक्रम चालविणाऱ्या व कोणत्याही खास प्रकल्प हाती घेणाऱ्या (जसे दोन भाषांमध्ये अनुवाद नियमावली तयार करणे) विद्यपीठीय विभागांना अनुदान

शेवटी थोडक्यात, या सर्वांची काळजी घेणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मुलभुत ध्येयांवर अभियानाचे लक्ष निम्नलिखित अपेक्षित परिणामांवर केंद्रीत उरेल:
  » विभिन्न क्षेत्रातील कुशल व योग्य अशा अनुवादकांचा डाटा भंडार तयार करणे. हा संग्रह विशिष्ट गरजेनुसार NTM शी संपर्क साधल्यास ऑनलाइन उपलब्ध होईल.
  » शैक्षणिक संस्था, वाचनालय नेटवर्क इत्यादींना सातत्याने पाठवण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकृतींच्या उपलब्ध भाषांतराची नव्या सूचीबरोबर डाटा भंडार व माहिती पत्रके तयार करणे.
  » अनुवादकांसाठी अल्पावधिच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे.
  » दर्जेदार अनुवाद साहित्याचा प्रसार व प्रोत्साहन देणे.
  » मशीनी अनुवादास प्रोत्साहन देणे.

नियतकालिकांच्या सूचीचा विस्तार करणे जे पाठबळ देण्यास समर्थ असतील, इथे आम्ही संभवीत नावांची यादी देऊ शकतो जी एकदा प्रकल्पाला मान्यता मिळाल्यावर पुढील चर्चेचा विषय ठरेल:
 
अनुवादासाठी नियतकालीके
(प्रस्तावित एनटीएम के तहत समर्थित)

असामी
1.गरीयसी (सम्पादक हरेक्रिष्ण देका)
2. प्रान्तिक (सम्पादक पी. जी. बोरुहा)
3. अनुराध पारंपार (संपादक पी. ठाकुर)

बंगला/बंगाली
4. अनुवाद पत्रिका
5. भाषांगर (अनियतकालिक)
6. भाषाबंधन
7. एबांग मुशायरा
8. विज्ञापन पर्व (कला आणि सृजनात्मक लेखांचा अनुवाद)
9. अंतरजातीक आंगिक (क्षेत्रीय तथा अंर्तराष्ट्रीय माध्यमाच्या अनुवादावर केंद्रीत)
10. प्रभान्तर (प्रामुख्याने क्षेत्रीय अनुवाद, हेतु—पाठ आणि लेखकांवर केंद्रीत)

बोडो
11. बोडो साहित्य सभा पत्रिका

इंग्रजी
12. इंडीयन लिट्रेचर (साहित्य अकादमी)
13. ट्रान्सलेशन टूडे ( ट्रान्सलेशन अध्ययन हेतु CIIL ने प्रकाशित केलेली पत्रिका)
14. यात्रा (असमियाद्वारे अनूवादित)
15. अनिकेतन (कंन्नड मधील)
16. मल्याळम लिट्रेरी सर्वे (मलयालम मधील)
17. उर्दू अलाइव (उर्दू मधील)
18. कोबिता रिव्यू (द्विभाषिक, बंगाली- इंग्रेजी)
19. इन्टरनॅशनल जर्नल इन ट्रान्सलेशन (बाहरी प्रकाशन)

गुजराती
20.वाइ (बऱ्याच प्रमाणात अनुवादचा समावेश असतो)
21. गद्यपर्व

हिन्दी
22. तन्व (भारतीय, विदेशी तथा विविध भाषांमधील)
23. अनुवाद (अनुवादावर लेख त्याचबरोबर अन्य भाषातील अनुवाद)
24. पहल
25. समकालीन भारतीय साहित्य (साहित्य अकादमी)
26. वागार्थ
27. नया ज्ञानोदय
28. भारतीय अनुवाद परिषद पत्रिका

कन्नड
29. अनिकेतन (अन्य भारतीय भाषांमधील, हे इंग्रजीतील अनिकेतनला पर्यावसायी आहे)
30. देश-काल (अनुवादाचा संग्रह)
31. संक्रमण (अनुवादाचा संग्रह)
32. संवाद (मोठ्या प्रमाणात अनुवादाचे प्रकाशन)
33. संकलन (अनुवादही प्रकाशीत करते)

कश्मीरी
34. सिराज-कश्मीरी (संस्कृतिक विभाग,कश्मीर सरकार)
35. अलाव (सूचना प्रद्यौगिकी विभाग, कश्मीर सरकार)

कोंकणी
36. जाग (मासिक, अनुवादांचा संग्रह)

मलयालम
37. केरळ कविता (अनुवादांचा संग्रह, मुख्यतः साहित्यिक पाठ)
38. मातृभूमि (विशेष अनुवाद अंक)
39. कला कुमुदी
40. मध्यमम

मराठी
41. कल्याने भाषांतर
42. भाषा अणि जीवन
43. प्रतिष्ठान (अनुवाद संग्रह)
44. पंचधारा (मराठी बरोबरच हिन्दी, तेलुगू आणि कन्नड अनुवाद)
45. साक्षात (अनुवादावर प्रकाशित खास अंक)

मैथिली
46. मैथिली अकादमी पत्रिका (ज्ञान पाठांचा समावेश असतो)
47. घर-बाहर (अनुवादाचा समावेश)

उडिया
48. सप्तभाषिका

पंजाबी
49. समदर्शी (पंजीबी अकादमी, नयी दिल्ली अधुनमधुन अनुवाद प्रकाशीत करते)
50. अख्खर (अमृतसर, मुख्यत्वे सर्जनशील व समीक्षात्मक अनुवादाचे प्रकाशन)

संथाली
51. सार-सगुन
52. लोहंती पत्रिका

तमिळ
53. दिसाइकल एट्टूम (सर्व भारतीय भाषांमधील)

तेलुगू
54. विपुल (बहुतकरुन विभिन्न भाषांमधील अनुवाद)
55. तेलुगू वैज्ञानिक पत्रिका (तेलुगू अकादमी)